
पहलगाम हल्ल्याला आज एक महिना पूर्ण झाला. या महिनाभरात हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान व पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. त्यानंतर हिंदुस्थान पाकिस्तानसोबत युद्ध करेल अशी परिस्थिती असतानाच दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी करार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तर आपण मध्यस्थी केल्यामुळे तसेच दोन्ही देशांना अमेरिकेसोबत व्यापार करायचा असल्यास युद्ध थांबवण्यास सांगितल्याचे जाहीर केले होते. त्यावरून काँग्रेस खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन प्रश्न केले आहेत.
मोदी जी, खोखले भाषण देना बंद कीजिए।
सिर्फ इतना बताइए:
1. आतंकवाद पर आपने पाकिस्तान की बात पर भरोसा क्यों किया?
2. ट्रंप के सामने झुककर आपने भारत के हितों की कुर्बानी क्यों दी?
3. आपका ख़ून सिर्फ़ कैमरों के सामने ही क्यों गरम होता है?आपने भारत के सम्मान से समझौता कर लिया! pic.twitter.com/HhjqbjDsaB
— Rahul Gandhi (@RahulGandhi) May 22, 2025
राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींच्या भाषणाची क्लिप शेअर करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. ”मोदीजी, पोकळ भाषणं करणं थांबवा. फक्त माझ्या या तीन प्रश्नांची उत्तरं द्या. 1) दहशतवादावरून पाकिस्तानच्या दाव्यांवर आपण विश्वास कसा ठेवला? 2) ट्रम्प यांच्या समोर झुकून आपण देशाच्या हिताची कुर्बानी का दिली? 3) तुमचं रक्त फक्त कॅमेरा समोरच खवळतं का? तुम्ही देशाच्या सन्मानाची तडजोड केली; असे राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे.