
जयपूरमध्ये मिठाईच्या दुकानातील काही गोड पदार्थांची नावे बदलण्यात आली आहेत. दहशतवादी हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असल्याने याचा निषेध म्हणून जयपूरमधील मिठाईच्या दुकानातील म्हैसूर पाक यामधील पाक शब्द हटवला असून त्या जागी आता म्हैसूर श्री असे नाव देण्यात आले आहे. जयपूरमध्ये तयार होणाऱया स्वर्ण भस्म पाक, मोती पाक, आम पाक, गोंद पाक, म्हैसूर पाक या नावातील पाक शब्द काढून टाकला असून त्याजागी श्री आणि भारत शब्द जोडला गेला आहे, असे येथील दुकानदारांनी सांगितले आहे. देशभक्ती ही केवळ सीमेवरच नाही तर प्रत्येक नागरिकांमध्ये असायला हवी, यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे येथील दुकानदारांनी म्हटले आहे.