Video ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री सन्मान प्रदान

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. आज राष्ट्रपती भवन येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला अशोक सराफ यांच्या सोबत त्यांच्या पत्नी निवेदीता सराफ देखील उपस्थित होत्या.

हा माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. हा खूप मोठा सन्मान आहे. मला आनंद आहे की माझी या सन्मानासाठीनिवड झाली. आता असं वाटतंय की आपण खरंच आयुष्यात काहीतरी केलंय. हा पुरस्कार सन्मान माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, अशी प्रतिक्रीया अशोक सराफ यांनी सन्मान सोहळ्यानंतर दिली.

”पद्मश्री हा सन्मान माझ्या जीवनातील एक विशेष क्षण आहे. मी महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो. माझ्या कुटुंबीयांचे, सहकलाकारांचे आणि प्रेक्षकांचेही आभार. तुमच्या प्रेमाशिवाय हे शक्य झालं नसतं. तुमचा प्रेम आणि आशिर्वाद कायम असाच राहू द्या”, अशी प्रतिक्रीया अशोक सराफ यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली.