रेल्वेला रेल नीरमधून 96 कोटींचा नफा

रेल्वे प्रवासात 15 रुपयांत मिळणाऱ्या पाण्याच्या बॉटलने आर्थिक वर्ष 2025 च्या चौथ्या तिमाहित 96 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आयआरसीटीसीने चौथ्या तिमाहित 358 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. आयआरसीटीसीने गेल्या वर्षी 284 कोटी रुपयांचा नफा कमावला होता. आयआरसीटीसीने चौथ्या तिमाहीची आकडेवारी जाहीर केली आहे. ऑपरेशन्समधून मिळणारा एपूण नफा 1269 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कॅटरिंग सेक्टरमधून 529 कोटींचा नफा मिळाला.