
शाश्वततेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत ‘सृजन 2025’ या विषयावर आधारित एक दिवसीय परिसंवादाचे आयोजन ‘First Sunday’ या संस्थेने केले आहे. हा परिसंवाद 1 जून 2025 रोजी रविवारी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत इंस्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, शिवाजीनगर, पुणे येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमामध्ये अन्न, ऊर्जा, पाणी, तंत्रज्ञान, सामाजिक परिणाम आणि शाश्वतता या सहा प्रमुख क्षेत्रांवर चर्चा होणार आहे. अन्न प्रक्रिया, शाकाहारी (विगन) जीवनशैली, सौर व वाऱ्याची ऊर्जा, जलसंधारण, कचरा व्यवस्थापन अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर तज्ज्ञ आपले विचार मांडतील.
पुण्यातील डॉ. संदीप कडवे आणि डॉ. के. सी. मोहिते हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत. कार्यक्रमाचे सह-आयोजक आहेत टेक्नोवेटर्स तर इनक्युबेट पार्टनर हे मेंटॉरिंग पार्टनर म्हणून सहभागी आहेत. अरिहंत इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सी पुणे हे सिल्व्हर स्पॉन्सर आहेत.