
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर मोदी सरकारची येत्या 3 जुलैपासून पहिली अग्निपरीक्षा सुरू होणार आहे. 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार असून पहलगामसारख्या दहशतवादी हल्ल्याचा पुन्हा सामना करावा लागू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने ‘सीएपीएफ’ अर्थात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तब्बल 580 पंपन्या जम्मू आणि कश्मीरमध्ये तैनात करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच सर्व कंपन्यांना तत्काळ जम्मू-कश्मीरमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. अमरनाथ यात्रा 2 जुलैपासून सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. 580 कंपन्यांपैकी 150-160 युनिट आधीपासूनच जम्मू-कश्मीरमध्ये तैनात करण्यात आली असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली. सीआरपीएफची सीएपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबी या कंपन्यांच्या तुकड्या अमरनाथ यात्रेच्या मार्गावर तैनात असणार आहेत. प्रत्येक कंपनीत 70 ते 75 सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संख्याबळ असणार आहे, अशी माहिती ‘सीआरपीएफ’चे महासंचालक ग्यानेंद्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
एकदिवस पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचा होईल- राजनाथ सिंह
एक दिवस पाकव्याप्त कश्मीर हिंदुस्थानचा भाग असेल असे विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आहे. पीओकेमध्ये राहाणारे लोक हिंदुस्थानवासीच आहेत. एक दिवस हे लोक हिंदुस्थानचा भाग असतील असा आम्हाला विश्वास आहे असे संरक्षण मंत्री म्हणाले. पीओकेतील मोठ्या संख्येने नागरिकांना हिंदुस्थानशी जोडले गेल्यासारखे वाटते. तेथे राहणाया मूठभर लोकांनाच भ्रमिष्ट केले जाऊ शकते. एक दिवस पीओके हिंदुस्थानचा भाग बनेल, असेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
अमित शहा कश्मीर दौऱ्यावर; पूँछमधील पीडितांची भेट घेणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून कश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. आज रात्री उशीरा ते राजभवनात सुरक्षा दलांसोबत बैठक घेणार असून जम्मू आणि कश्मीरमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेणार आहेत. गृहमंत्र्यांच्या दौयाच्या पार्श्वभूमीवर येथील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. शुक्रवारी ते पूंछ जिह्यात पाकिस्तानी गोळीबारामुळे नुकसान झालेल्या पीडितांची भेट घेणार आहेत. तसेच येथील परिस्थती जाणून घेणार आहेत.
























































