
हिंदुस्थानचा यशस्वी कर्णधार, यष्टिरक्षक आणि फलंदाज अशा तिहेरी भूमिकेत इतिहास रचणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आयसीसीच्या हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले आहे. आयसीसीने आपल्या प्रतिष्ठत यादीत धोनीसह मॅथ्यू हेडन, ग्रीम स्मिथ, हाशिम अमला, डॅनियल वेट्टोरी या पाच क्रिकेटपटूंसह सना मिर आणि सारा टेलर या दोन महिला क्रिकेटपटूंनाही स्थान लाभले आहे. धोनी हा हिंदुस्थान संघाला टी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून देणारा एकमेव कर्णधार आहे.