Air India Plane Crash – पत्नीच्या अस्थी विसर्जनासाठी मायदेशी आला अन्…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमरेलीतील वाडिया येथील रहिवासी अर्जुन पटोलिया यांचे अपघातात निधन झाले. अर्जुन पटोलिया यांच्या पत्नी भारती  यांचे सात दिवसांपूर्वी लंडनमध्ये निधन झाले. त्यांच्या पत्नीची इच्छा होती की त्यांच्या अस्थीचे विसर्जन गावातील तलाव आणि नदीत व्हावे. पत्नीच्या इच्छेनुसार अर्जुन गुजरातला आले होते. यानंतर त्यांनी अमरेली येथील त्यांच्या गावातील नातेवाईकांसोबत काही अंत्यसंस्कार विधी पूर्ण केले, परंतु लंडनला परत आपल्या मुलांकडे परतू शकलेले नाहीत. अर्जुन यांना दोन मुले असून ती सध्या लंडनमध्ये आहेत. दोन्ही मुलींनी त्यांचे आई आणि वडील गमावले.