Air India च्या विमानातून कधीच प्रवास करणार नाही, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची पोस्ट चर्चेत

अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण जग हादरुन गेलं आहे. या अपघातात 270 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्ती या अपघातात गमवल्या आहेत. अपघाताची भिषणता इतकी होती की, सर्वांनाच मानसिक धक्का बसला असून सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डेव्हिड वॉर्नरने एक पोस्ट शेअर केली असून, “मी आता एअर इंडियाच्या विमानातून कधीच प्रवास करणा नाही.” अस तो म्हणाला आहे.

मैदानावार आणि मैदानाबाहेरही मजेशीर स्वभावासाठी डेव्हिड वॉर्नर ओळखला जातो. त्याचा हिंदुस्थानात मोठा चाहतावर्ग आहे. अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातानंतर त्याने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. तसेच त्याने एअर इंडियाच्या सर्व्हिसवर प्रश्चचिन्ह निर्माण केलं आहे. त्याने एक्सवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये तो म्हणाला होता की, “मला एअर इंडियाच्या अशा विमानात बसवण्यात आलं होतं, ज्यामध्ये पायलटच नव्हता. तुच्याकडे पायलटच नाही तर तुम्ही लोकांना विमानात का बसवता,” अशा शब्दांत त्याने एअर इंडियाला सवाल केला होता. आता अहमदाबाद अपघातानंतर त्याने इन्स्टाग्रावर एक स्टोरी शेअर करत मी आता पुन्हा कधीच एअर इंडियाने प्रवास करणार नसल्याचं म्हणाला आहे.