
अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती नागरी व उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. तसेच ज्या लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांची ओळख पटवून त्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुबीयांकडे सोपवणं हे सर्वाधिक आव्हानात्मक आहे असेही मोहोळ म्हणाले.
इंडियन एक्सप्रेसला मुरलीधर मोहोळ यांनी मुलाखत दिली आहे. त्यात मोहोळ म्हणाले की, मृतांपैकी 220 मृतदेहांचे डीएनए नमुने घेतले आहेत. त्यापैकी आठ मृतदेहांची ओळख पटली असून त्यांचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांकडे देण्यात आले आहेत. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 50 जखमींवर उपचार सुरु होते. त्यातील 30 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काही जखमींची तब्येत अद्याप गंभीर असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.
आता सर्वात मोठे आव्हान म्हणजे मृतांची ओळख पटवण्याची आहे असे मोहोळ म्हणाले. तसेच मृतांची ओळख पटल्यास तातडीने त्यांच्या आप्तस्वकीयांकडे त्यांचे मृतदेह सोपवले जातील असे मोहोळ यांनी सांगितले.




























































