निर्वाण शहा, भूमिका वाघेला यांना विजेतेपद

खुल्या गटात मुंबई शहरच्या निर्वाण शहा याने, तर मुलींच्या गटात संभाजीनगरच्या भूमिका वाघेला हिने एच 2 इ पॉवर सिस्टिम महाराष्ट्र राज्य 11 वर्षांखालील खुल्या व मुलींच्या गटात फिडे रेटेड निवड बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकाविले.  कर्वे रोड येथील श्री गणेश सभागृहात ही स्पर्धा पार पडली. खुल्या गटात पहिल्या पटावरील लढतीत मुंबई शहराच्या निर्वाण शहाने मुंबई उपनगरच्या विहान अग्रवालचा पराभव करून 7.5 गुणांसह विजेतेपद पटकावले. मुंबई उपनगरच्या विहान अग्रवालने 7 गुणांसह दुसरे स्थान मिळवले. कोल्हापूरच्या विवान सोनी याने मुंबई शहरच्या रेयांश व्यंकटला बरोबरीत रोखले व 7 गुणांसह (40.5 बुकोल्स कट) तिसरा क्रमांक पटकावला.