
इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. इराणी सरकारी माध्यमांनुसार, खमेनी यांनी स्पष्ट केले आहे की, “इराण कधीही सरेंडर नाही. जर अमेरिकेने कोणताही लष्करी हल्ला केला तर, त्याचे परिणाम खूप वाईट होतील, जे कधीही भरून काढता येणार नाहीत.”
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष्य डोनाल्ड ट्रम्प यांनी खामेनी यांना बिनशर्त आत्मसमर्पणा करण्यास सांगितलं होतं. ट्रम्प यांनी म्हटले होते की, अमेरिकेला खामेनेई कुठे लपले आहेत हे माहित आहे आणि त्यांना सहज लक्ष्य करता येऊ शकते. यावर प्रतिक्रिया देताना खामेनी म्हणाले, “ज्यांना इराणचा इतिहास माहित आहे ते धमक्यांची भाषा बोलत नाहीत.”
खामेनी यांनी त्यांच्या संदेशात इराणी जनतेचे कौतुक केले आणि म्हटले की, “इस्रायली हल्ल्यांनंतर लोकांचा संयम आणि धाडस हे त्यांच्या राष्ट्रीय सामर्थ्याचे प्रतीक आहे. ते म्हणाले की, इराणी राष्ट्र कोणत्याही लादलेल्या युद्धापुढे झुकणार नाही आणि कोणताही लादलेला शांतता करारही स्वीकारणार नाही.”
दरम्यान, इराण आणि इस्रायलमधील संघर्ष सहाव्या दिवशीही सुरू आहे. इस्रायलने इराणच्या राजधानी तेहरानवर हवाई हल्ले केले, तर इराणनेही हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांनी इस्रायलवर प्रत्युत्तरादाखल हल्ले केले. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव आणखी वाढला आहे.