
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात ऑपरेशन ‘सिंदूर’नंतर हिंदुस्थान-पाकिस्तान युद्धविरामावर झालेल्या चर्चेवरून काँग्रेसने बुधवारी टीकेची झोड उठवली. फोनवर झालेल्या या चर्चेचे सरकारकडून ‘राजनैतिक यश’ म्हणून वर्णन करण्यात आले असले, तरी काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी यालाच ‘तिहेरी झटका’ (Triple Jhatka) असं म्हटले आहे.
ट्रम्प-आसिम मुनिर भेटीवर टीका
जयराम रमेश यांनी काही प्रमुख मुद्द्यांवर लक्ष वेधले आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात चर्चा झाली, तेव्हा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल आसिम मुनिर यांची व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्पसोबत लंच मिटिंग नियोजित होती. जयराम रमेश यांनी सवाल केला आहे की , ‘ज्याच्या चिथावणीखोर आणि धार्मिक विधानांमुळे 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला घडवून आणला गेला, त्या आसिम मुनिर याला व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केले गेले आहे. याचमुळे अध्यक्ष ट्रम्प G7 परिषदेवरून एक दिवस आधी परतले काय?’
‘पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्यासमोर मुद्दा मांडला का?’
जयराम रमेश यांनी पुढे विचारले आहे की, ‘पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पसमोर आसिम मुनिरच्या धार्मिक चिथावणीखोर वक्तव्याचा आणि त्यातून घडलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला का?’ परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी जाहीरपणे सांगितले होते की, ‘ही धार्मिक विद्वेषपूर्ण भूमिका हीच त्या हल्ल्यांमागची प्रेरणा होती’, अशी आठवण देखील त्यांनी करून दिली.
काँग्रेसचा आक्षेप: हिंदुस्थानची प्रतिमा मलीन
काँग्रेसचा आरोप आहे की, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात दहशतवादावर चर्चा होत असताना पाकिस्तानचे लष्करप्रमुख अमेरिकेत उपस्थित असणे, हे हिंदुस्थानसाठी राजनैतिक अपयश ठरते.
जयराम रमेश यांनी ट्रम्प यांच्या पूर्वीच्या 14 वक्तव्यांचा उल्लेख करत सांगितले की, ‘अमेरिकेने आधीच दावा केला आहे की त्यांनी हिंदुस्थान-पाकिस्तान प्रश्न सोडवण्यासाठी मध्यस्ती केली आहे. तसेच एका अमेरिकी जनरलने पाकिस्तानला दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी ‘उत्कृष्ट भागीदार’ म्हटले होते.
काँग्रेसची मागणी: संसदेत खुलासा करा
’37 दिवस पंतप्रधानांनी मौन पाळले, आणि आज अचानक 35 मिनिटांचा कॉल झाल्याचे सांगण्यात आले. व्हाईट हाऊस आणि हिंदुस्थान सरकारच्या निवेदनांमध्ये फरक आहे. मग पंतप्रधानांनी संसदेला का माहिती दिली नाही?’, असा सवाल जयराम रमेश यांनी उपस्थित केला.
त्यांनी पुढे म्हटले की, ‘पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून ट्रम्पशी जे बोलले त्याचा खुलासा संसदेत करावा आणि विरोधकांचा विश्वास संपादन करावा’.
G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो
Congress Slams Modi-Trump Call as ‘Triple Jhatka’ Amid Asim Munir-White House Lunch
Keywords: Modi Trump phone call, Asim Munir White House, Congress triple jhatka, India Pakistan ceasefire, Pahalgam terror attack, General Asim Munir remarks, Operation Sindoor India, Jairam Ramesh on Modi, India US diplomacy, PM Modi Parliament briefing