देवाभाऊ आणि अजितदादांमध्ये दुरावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांची उद्घाटने, भूमिपूजन आणि देहू पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, जिह्याचे पालकमंत्री अजित पवार आमंत्रित होते. मात्र, महापालिकेच्या कार्यक्रमांकडे पालकमंत्री पवार यांनी पाठ फिरवली. देहूतील पालखी सोहळ्यापूर्वीच पवारांनी हजेरी लावून फडणवीसांसोबत एकत्र येण्याचे टाळले. त्यामुळे देवाभाऊ आणि अजितदादांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा रंगू लागली आहे.