
मोहालीमध्ये एक भयावह घटना उघडकीस आली आहे. येथील प्रॉपर्टी डीलरने एक धक्कादायक पाऊल उचलले आहे. या प्रॉपर्टी डीलरने प्रथम पत्नी आणि मुलाला गोळ्या घातल्या, त्यानंतर त्याने स्वतःही आत्महत्या केली. यामागचे कारण अद्याप मात्र कळलेले नाही. बानूर-टेपला राष्ट्रीय महामार्गावरून छगेरा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर फॉर्च्युनर कारमध्ये तीन मृतदेह आढळल्याने परिसरात घबराट पसरली. मृतांची ओळख पटली असू, संदीप सिंग राजपाल (45) हे लांबी (जिल्हा भटिंडा) जवळील शिखवाला गावातील रहिवासी आहेत. त्यांची पत्नी मनदीप कौर (42) आणि त्यांचा मुलगा अभय (15) हा अभय गतिमंद होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब गेल्या आठ वर्षांपासून मोहालीतील एमआर सेक्टर-109 मध्ये राहत होते. त्यांची पत्नी त्यांच्या शेजारी असलेल्या सीटवर पडली होती आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह मागच्या सीटवर पडला होता. तिन्ही मृतांच्या डोक्यात गोळ्या झाडलेल्या निदर्शनास आले. शेतात काम करण्यासाठी आलेल्या काही जणांनी या घटनेची माहिती दिली. त्यांनी कारमध्ये मृतदेह पाहून बानूर पोलिसांना फोन केला. त्यानंतर डीएसपी मनजीत सिंग, बानूर पोलिस स्टेशनचे एसएचओ अर्शदीप शर्मा, तपास अधिकारी हरदेव सिंग, एएसआय जसविंदर पाल त्यांच्या टीमसह तात्काळ घटनास्थळी पोहोचले.
फॉरेन्सिक तज्ञ आणि एफएसएल टीम देखील घटनास्थळी पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना संध्याकाळी 4 वाजता घडली होती. रात्री 8 वाजता सर्व कार्यवाही पूर्ण केल्यानंतर पोलिसांनी कुटुंबातील तिन्ही सदस्यांचे मृतदेह नीलम रुग्णालयाच्या शवागारात ठेवले होते. डीएसपी राजपुरा मनजीत सिंह आणि बानूर पोलिस स्टेशनचे प्रमुख अर्शदीप शर्मा यांनी सांगितले की, हा आत्महत्येचा प्रकार आहे. त्यांनी सांगितले की, याबाबतची कारणे मात्र अद्याप अस्पष्ट आहेत.
या मृतकाचे कुटुंबीय आल्यानंतरच सोमवारी पोस्टमॉर्टम केले जाईल. घटनास्थळी पोहोचलेल्या मृतकाचे नातेवाईक अमरिंदर सिंह यांनी सांगितले की, संदीप सिंग शेतकरी कुटुंबातील आहेत. याबरोबरीने ते प्रॉपर्टीच्या व्यवसायतही कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, त्यांचे सुमारे एक आठवड्यापूर्वी बोलणे झाले होते. मृतकाचा एक भाऊ त्याच्या गावात राहतो. तर त्यांची बहीण परदेशात स्थायिक आहे. ही घटना समजताच, मोठ्या संख्येने शेजारीही घटनास्थळी पोहोचले होते.