तिलक वर्माचे काऊंटीत पदार्पणातच शतक 

हिंदुस्थानी क्रिकेटपटू तिलक वर्माने इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच शतक झळकवीण्याचा पराक्रम केला. हॅम्पशायर क्लबकडून खेळताना त्याने एसेक्स संघाविरुद्ध ही शतकी खेळी केली. एसेक्स संघाला 98.1 षटकांत 296 धावांवर रोखल्यानंतर प्रत्युत्तरादाखल हॅम्पशायर क्लबची 2 बाद 34 अशी दुर्दशा झाली होती. आपला क्लब संकटात असताना तिलक वर्मा फलंदाजीला आला. त्याने 241 चेंडूंच्या खेळीत 100 धावा करताना 11 चौकारांसह 3 षटकार ठोकले. शंभर धावांवर तो बाद झाला. त्यानंतर लियाम डॉसनच्या शतकी खेळीमुळे हॅम्पशायर क्लबने चारशे धावांचा टप्पा ओलांडला.