सोशल मीडिया बनला गोपनीयतेचा शत्रू, लोकप्रिय अॅप्स युजर्सची ऑक्टिविटी गुपचूप होतेय ट्रक

facebook-whatsapp-instagram

तुमच्या कधी लक्षात आलंय का, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मित्रांशी बोलतो तेव्हा ती गोष्ट फेसबुक, इन्स्टा, यूटय़ूबवर अचानक दिसू लागते. एका नव्या रिपोर्टमधून असे दिसून आलेय की, सोशल मीडिया केवळ आपल्या पोस्टच नव्हे तर आपल्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवतो. ब्रिटनची रिसर्च एजन्सी ‘अॅप्टेको’च्या रिपोर्टनुसार, फेसबुक, इन्स्टा, यूटय़ूबसारखे लोकप्रिय अॅप्स युजर्सची ऑक्टिविटी गुपचूप ट्रक करतात. त्यातील तुमची आवड, सर्च हिस्ट्री, तुमचे लोकेशन आदी रेकॉर्ड केले जाते. लोकप्रिय अॅप्सच्या माध्यमातून तुमची माहिती गोळा केली जाते. एकप्रकारे तुमची डिजिटल प्रोफाईल तयार होते. त्यातून समजते की, तुम्हाला काय खरेदी करायचे आहे, तुमचा इंटरेस्ट कशात आहे. एखाद्या मुद्दय़ावर तुमचे मत काय आहे. तुम्ही कोणत्या लोकांशी जोडले आहात. जेणेकरून त्याच पद्धतीचा कंटेट आपल्याला दाखवला जावा. काही कंपन्या दावा करतात की, युजर एक्सपिरियन्स चांगला करण्याचा उद्देशाने असा वॉच ठेवला जातो. मात्र डिजिटल डेटाचा गैरवापर होण्याचीही शक्यता असते.

प्रायव्हसी कशी सुरक्षित ठेवाल?

  • कोणतेही अॅप इन्स्टॉल करताना परमिशनवर लक्ष द्या. म्हणजे गरज नसताना ‘अलाऊ’वर क्लिक करू नका.
  • कॅमेरा, मायक्रोफोन, लोकेशन यांसारख्या संवेदनशील ‘परमिशन’ अगदी जरुरी असेल तेव्हाच द्या.
  • फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन वारंवार कोणत्या अॅप्सला परमिशन दिली गेली आहे ते तपासा आणि अनावश्यक अॅक्सेस बंद करा.
  • फक्त अधिकृत प्लॅटफॉर्मवरूनच अॅप्स डाऊनलोड करा.
  • अॅप्सची डेटा पॉलिसी, रिह्यू आणि रेटिंग अवश्य वाचा.