Benefits Of Pedicure- पावसाळ्यात पेडिक्योर करण्याचे फायदे, वाचा

पावसाळ्यात साठलेल्या पाण्यात पाय गेल्यामुळे, आपल्या पायातील नखांमध्ये घाण साचते. त्यामुळेच आपल्याला पावसाळ्यामध्ये आपल्या पायाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे हे खूप गरजेचे असते. पायातील नखांमध्ये घाण साचून राहिल्याने, नखं दुखणं किंवा त्यात जखमा होणं अशा गोष्टी होतात. म्हणूनच खासकरुन पावसाळ्याच्या सीझनमध्ये पायाची काळजी घ्यायलाच हवी.

पायांचे आरोग्य जपण्यासाठी आपण पेडिक्योर करणे हे खूप गरजेचे आहे. आपण फेशियल, वॅक्सिंग महिन्याला जाऊन करतो. परंतु पायांच्या सौंदर्याकडे आजही आपण दुर्लक्ष करतो. पायांचे सौंदर्य केवळ दिसण्यापुरते मर्यादीत नाही, तर पायांची उत्तम निगा राखल्यामुळे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे.

आपल्या शरीराचा भार हा पायांवर येत असल्यामुळे पायांची निगा राखणे काळजी घेणे हे खूप गरजेचे आहे. पायांची निगा राखण्याचा एकमेव उत्तम पर्याय म्हणजे पेडीक्योर करणे. पेडीक्योर करण्यासाठी महिन्यातून किमान एखादा दिवस काढायलाच हवा. त्यामुळे आपल्या शरीरासाठी खूपच फायदा मिळतो.

काय होतात पेडीक्योर केल्यामुळे शरीरासाठी फायदे?

  • पेडीक्योर केल्यामुळे, शांत झोप लागण्यास मदत होते.

  • पेडीक्योरमुळे पायांचे सौंदर्य वाढण्यास मदत होते. पायाच्या त्वचेवरील मृत पेशी निघून गेल्यामुळे पायही सुंदर दिसू लागतात.

  • पेडीक्योरमुळे अनेक प्रकारच्या आजारांपासून बचाव होतो.

  • पेडीक्योरमध्ये नखांची उत्तम काळजी घेतली जाते, तशीच नखांची स्वच्छता केल्यामुळे नखांची चमक वाढते आणि नखांचे आरोग्य सुधारते.

  • पेडीक्योरमुळे भेगा पडलेल्या टाचांनाही आराम मिळतो, त्यामुळे टाचांचे सौंदर्य वाढते.

  • पेडीक्योर करताना पायांची मालिश केली जाते, त्यामुळे आपले संपूर्ण शरीर रिलॅक्स होते.

  • पायांचे अनेक पाॅईंटस् मसाज करताना दाबले जातात, यामुळे पाठदुखी कमी होण्यासही मदत होते.

  • शरीरामध्ये उत्तम रक्तपुरवठा होण्यास मदत होते, तसेच आपल्या त्वचेवरही चकाकी येते.

  • नखांमधील घाण धूळ पेडीक्योर करताना स्वच्छ होते त्यामुळे संसर्ग रोखण्यास खूप मदत होते.

घरच्या घरी पेडीक्योर कसे करावे?

पायांच्या टाचांवरील आणि तळव्यांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी अक्रोड आणि लेमनग्रास असलेले स्क्रब वापरणे सर्वात उत्तम.

पेडीक्योर पूर्ण झाल्यानंतर, शेवटी ऑइल लावा. ऑइल हे नखांच्या विविध समस्यांवर उपचार करण्यास मदत करते.

संसर्ग टाळण्यासाठी पेडीक्योर उपकरणे स्वच्छ आणि निर्जंतुक ठेवणे महत्वाचे आहे. तुमची नखे आरोग्य आणि सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी नियमितपणे ट्रिम आणि फाईल करा.

 

Benefits Of Kansya Thali Foot Massage- उत्तम आरोग्यासाठी काशाच्या थाळीने तळपायाचा मसाज का करावा?