फ्लाइटमधुन प्रवास करताना आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालावेत?

एक काळ होता जिथे विमान प्रवास हा स्वप्नवत वाटायचा. परंतु अलीकडे मात्र सर्रास विमान प्रवास हा केला जात आहे. विमान प्रवास पहिला वहिला असेल तर, मात्र धाकधुक, हुरहुर अशा अनेक भावनांचा कल्लोळ उठतो. विमान प्रवासाला जाताना आपण अनेकदा काही अनवधानाने चुका करतो. या चुका म्हणजे आपली कपड्यांची निवड.

विमान प्रवासाला जाताना कोणत्या पद्धतीचे कपडे आपण घालायला हवेत हे माहीत नसल्याने गोंधळ उडतो. प्रत्येक ठिकाणी कपडे कोणते आणि कसे घालावेत याचे काही नियम असतात. तेच नियम विमान प्रवासामध्येही लागु होतात.

क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स यासारखे कपडे विमान प्रवास करताना घालणे टाळायलाच हवेत. यामुळे आपण कम्फर्टेबल नसतो. तसेच हे कपडे विमानामध्ये घातल्यामुळे, पायांना थंडी लागुन आजारी पडण्याचा धोकाही संभवतो. म्हणूनच विमान प्रवासात काॅटनचे कपडे हे सर्वात उत्तम असतात.

विमानामध्ये सिंथेटिक आणि पॉलिस्टर कपडे घालणे धोकादायक ठरू शकते. हे कपडे शरीराला चिकटतात आणि विमानात आगीसारखी परिस्थिती उद्भवल्यास, कपडे जळण्याचा धोका असतो. तसेच हे कपडे अंगाला चिकटण्याचाही संभव असतो.

टाइट जिन्स किंवा लेगिंग्जही विमान प्रवासात घालणे टाळायला हवे. या कपड्यांमुळे रक्त साकळण्याचा धोका निर्माण होता. लांब पल्ल्याची फ्लाइट असल्यास, हा धोका अधिक वाढण्याचा संभव असतो. जसे की, खूप घट्ट असलेले स्किनी जीन्स, घालण्यामुळे पायांमध्ये रक्त साकळु शकते. घट्ट कपडे घातल्यामुळे, पायांमध्ये सुन्नपणा येण्याचा धोका असतो, तसेच पायांमध्ये वेदनाही होण्याची भीती मोठ्या प्रमाणात असते.

केवळ कपडेच नाही तर प्रवाशांनी सुरक्षित आणि आरामदायी प्रवास सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रवाशांनी मास्क घालणे, शारीरिक अंतर राखणे आणि हातांची चांगली स्वच्छता राखणे यासारख्या आवश्यक सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करु नये.