
मुंबईकरांना शिक्षण, आरोग्य, वीज, पाण्याची माफक दरात मुंबई महापालिका सुविधा देते. आरोग्यासाठी महापालिका रुग्णालये आणि महाविद्यालये आहेत, मात्र मुंबई महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या आणि अन्य अधिकाऱ्यांच्या 821 मंजूर जागांपैकी 587 जागा रिक्त आहेत. ही पदे एमपीएससीमार्फत भरली जाणार आहेत. मात्र ही पदे भरली जात नाहीत तोपर्यंत 347 पदे कंत्राट पद्धतीने भरली जाणार आहेत, अशी माहिती नगरविकास मंत्र्यांच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. मुंबई महापालिकेच्या महाविद्यालयांमधील रिक्त जागांबद्दल भाई जगताप यांनी तारांकित प्रश्न विचारून सरकारने याप्रकरणी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली होती.