
कॅब सेवा देणारी कंपनी उबरने आपल्या ग्राहकांसाठी नवीन आठ फीचर लाँच केले आहेत. यामध्ये वेट अँड सेव्ह, मेट्रो तिकीट बुकिंग, प्राइस लॉक, उबर फॉर सिनिअर्स, कुरीअर एक्सएल, उबर पॅट, एअरपोर्ट प्रायोरिटी ऍक्सेस, उबर एक्सएल प्लस असे आठ वेगवेगळे फीचर्स दिले आहेत. उबर ऍप असणाऱ्या युजर्सला आता थेट मेट्रोचे तिकीट ऍपवरून बुक करता येऊ शकणार आहे. ही सेवा दिल्लीत सुरू करण्यात आली असून लवकरच मुंबई आणि चेन्नईत सुरू करण्यात येणार आहे.