
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरू आहे. पहिल्या डावात इंग्लंडने सर्वबाद 387 धावा केल्या आहेत. प्रत्त्युत्तरात टीम इंडियाची सुरुवात थोडी खराब झाली. अशा परिस्थिती केएल राहुलने संयमी फलंदाजी करत ऋषभ पंतच्या मदतीने संघाला 200 पार नेलं. त्याने 177 चेंडूंचा सामना करत 13 चौकारांच्या मदतीने 100 धावांची खेळी केली.
सलामीला आलेला यशस्वी जयसवाल (13), करुण नायर (40) आणि कर्णधार शुभमन गिल (16) झटपट माघारी परतल्यामुळे 107 धावांवर टीम इंडियाच्या तीन विकेट गेल्या होत्या. त्यामुळे संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी केएल राहुल आणि ऋषभ पंतने आपल्या खांद्यावर घेत दमदार फलंदाजी केली. केएल राहुलने शतकं ठोकलं तसेच ऋषभ पंतनेही 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 112 चेंडूंचा सामना करत 74 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाने 200 चा आकडा पार केला. शोएब बासिरने टीम इंडियाला केएल राहुलच्या रुपात टीम इंडियाला पाचवा मोठा हादरा दिला. सध्या सामना सुरू असून टीम इंडियाने पाच गड्यांच्या मोबदल्यात 258 धावा केल्या आहेत. रविंद्र जडेजा (7*) आणि नितीश कुमार रेड्डी () फलंदाजी करत आहेत.
पनीर टिक्का अन् बासमती राईस; लॉर्ड्सवर खेळाडूंची मेजवानी, Menu व्हायरल