कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका चित्त्याचा मृत्यू

मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात नामिबियातून आणलेल्या 8 वर्षीय मादी चित्ता नाभा हिचा शनिवारी मृत्यू झाला. आठवडय़ापूर्वी नाभाला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्याचे वन विभागाने जाहीर केले. एका आठवडय़ापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांना तिने प्रतिसाद देणे थांबवले. अखेर शनिवारी तिचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे डॉक्टरांनी सांगितले. चित्ता रिइंट्रोडक्शन प्रोजेक्ट अंतर्गत नामिबियातून 8 मोठे चित्ते- यात 5 मादी आणि 3 नर 2022 मध्ये आणले होते.