
विरोधकांनी सातत्याने बांगलादेशातील अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा लावून धरला. परंतु मोदी सरकारने या प्रकरणी अद्याप ठोस पाऊल उचलले नसल्याचेच वेळोवेळी उघड झाले. आता बांगलादेशात 39 वर्षीय हिंदू व्यापाऱ्याचा काँक्रीटच्या स्लॅबने केलेल्या बेदम मारहाणीत मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचा मृत्यू झाल्यानंतर हल्लेखोर अक्षरशः त्याच्या मृतदेहावर नाचले. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केल्याचे वृत्त आहे.
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका जुन्या परिसरात हिंदू व्यापारी लाल चंद सोहाग यांची जमावाने बेदम मारहाण करून हत्या केली. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानतंर संपूर्ण देशात प्रचंड आंदोलने सुरू झाली आहेत. ढाक्यातील मुख्य विद्यापीठासमोर शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. हल्ले रोखण्यात बांगलादेशातील अंतरिम सरकार फेल ठरल्याच्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. दिवसाढवळ्या लाल चंद सोहाग यांची हत्या करण्यात आली. कोतलावाली पोलीस ठाण्यात लाल चंद यांची बहीण मंजूआरा बेगम यांनी हत्येचा गुन्हा नोंदवला.