सिडनीत खाटकाच्या नोकरीसाठी 140 अर्ज

सिडनी येथील आलेक्झांड्रिया क्लोव्हर मिट कंपनीने खाटकाची जागा भरण्यासाठी जाहिरात दिली. या नोकरीसाठी तब्बल 140 अर्ज आले. हे सगळे अर्ज हिंदुस्थान व पाकिस्तानातून आले आहेत. या नोकरीसाठी वार्षिक पगार 1 लाख 30 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर आहे. हिंदुस्थानी रुपयांनुसार हा पगार 73 लाख रुपये इतका असणार आहे. news.comau या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार या नोकरीसाठी शेकडो अर्ज आले आहेत. ऑस्ट्रेलियातील एकाही माणसाने अर्ज केला नाही याचे आश्चर्य वाटल्याची प्रतिक्रिया कंपनीने दिली आहे.