गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर पश्चिम रेल्वेच्या विशेष गाडय़ा

कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱया भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेपाठोपाठ पश्चिम रेल्वेनेही विशेष गाडय़ांची घोषणा केली आहे. पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरून गुजरातसह मुंबई येथून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडय़ांच्या फेऱया जाहीर करण्यात आल्या आहेत. 17 जुलै रोजी केलेल्या विशेष गाडय़ांमध्ये पश्चिम रेल्वेकडून पाच गणपती विशेष गाडय़ा चालवण्यात येणार आहेत.

पश्चिम रेल्वेने कोकणात जाणाऱया भाविकांसाठी 22 विशेष रेल्वे फेऱया जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये 9011/12 मुंबई सेंट्रल ते ठोकूर (साप्ताहिक), 09019/20 मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी (आठवडय़ातील चार दिवस 4 दिवस), 09015/16 वांद्रे ते रत्नागिरी साप्ताहिक विशेष गाडी, 09114/13 बडोदा ते रत्नागिरी (साप्ताहिक), 09110/09 विश्वामित्रा ते रत्नागिरी (साप्ताहिक) या पाच विशेष गाडय़ांचा समावेश आहे. या विशेष गाडय़ांचे आरक्षण 23 जुलैपासून सर्व पीआरएस काऊंटर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे. या विशेष गाडय़ांमुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील कोकणी जनतेची मोठी सोय होणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना दिलासा मिळणार आहे.