
तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांच्या गैरकारभार, अवांतर नोकरभरती आणि बनावट अॅप घोटाळा, यांसह विविध कारणांमुळे शनी मंदिराच्या अकरा विश्वस्तांना मुंबई धर्मादाय कार्यालयाने म्हणणे सादर करण्यासाठी 18 जुलै रोजी नोटिसा बजावल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी (दि.1) देवस्थानच्या विश्वस्तांची चौकशीसाठी सुनावणी होती. मात्र, मुंबई कार्यालयाकडून विश्वस्तांना म्हणणे सादर करण्यासाठी नकला कागदपत्रे उशिरा मिळाल्याचे कारण देत देवस्थानच्या वकिलांकडून पुन्हा मुदतवाढ मागितल्याने आता पुढील सुनावणी 11 ऑगस्ट रोजी ठेवली आहे. धर्मादाय कार्यालयाकडे देवस्थानने वकिलामार्फत तीन वेळा मुदतवाढ मागितली. मुंबई धर्मादाय कार्यालयाकडून विश्वस्तांना तारीख पे तारीख मिळत असल्याने हा विषय चर्चेचा ठरत आहे.
शनिमहाराजांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील भाविक तीर्थक्षेत्र शनिशिंगणापूर येथे येतात. भाविकांकडून सढळ हाताने पैसे दानपत्रात दान टाकले जाते. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल असताना, या विश्वस्तांकडून तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून केला गेला. या देवस्थानचा कारभार संपूर्ण राज्यात गाजत असल्याने शासनस्तरावर याची गंभीर दखल घेत कारवाईला वेग आला आहे. भाविकांच्या पैशाची उधळपट्टी, मनमानी कारभार, मोठ्या प्रमाणात अनियमितता तसेच २ हजार ४४७ जणांची केलेल्या नोकरभरतीचा मुद्दा विधानसभेत गाजला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवस्थानच्या केलेल्या फेर चौकशीचा अहवाल सभागृहात मांडला. या अहवालात गैरव्यवहार उघडकीस आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शनैश्वर देवस्थान विश्वस्तांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. त्याच अनुषंगाने मुंबई धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे अधीक्षक सीमा केणी यांनी विश्वस्तांना नोटिसा बजावत 18 जुलै रोजी मुंबईत हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, येथील विश्वस्त मंडळाने वकिलामार्फत म्हणणं मांडण्यासाठी कार्यालयाकडे मुदतवाढ मागितली. त्यानुसार २५ जुलै रोजी पुढील तारीख देण्यात आली. त्यावेळी मुदतवाढ मागितल्यानंतर 1 ऑगस्ट तारीख देण्यात आली. त्यानुसार आज पुन्हा विश्वस्तांच्या वतीने मुंबई येथील वकील जाधव यांनी मुदतवाढीची मागणी केली. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार आहे. वारंवार सुनावणी पुढे जात असल्याने विविध तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
विश्वस्त मंडळाची मुदत डिसेंबरमध्ये संपणार
६ जानेवारी २०२० रोजी अहिल्यानगर धर्मादाय आयुक्त यांनी निवडलेल्या विद्यमान विश्वस्त मंडळाची मुदत डिसेंबर २०२५ रोजी संपत आहे. शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्त मंडळाकडून गेल्या पाच वर्षांत केलेला अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. दरम्यान, देवस्थानचे उपकार्यकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्याने नाना शंकाकुशंका व्यक्त होत आहेत. विश्वस्तांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी सुरू आहे. मात्र, मुंबई धर्मादाय आयुक्तांनी तारीख पे तारीख दिल्याने विश्वस्तांचा कार्यकाल पूर्ण होण्याअगोदर घोटाळ्यांची चौकशी होऊन सत्य बाहेर येईल का,




























































