
दैनंदिन कामं करताना अनेकांना पाठदुखीचा त्रास होतो. पाठदुखी होत असेल तर यावर काही घरगुती उपाय आहेत. ते केल्यास पाठदुखी कमी होऊ शकते. सर्वात आधी पाठदुखीसाठी तेलाने मालिश करणे एक प्रभावी उपाय आहे. तुम्ही तिळाचे तेल, खोबरेल तेल किंवा मोहरीचे तेल मालिशसाठी वापरू शकता. नियमित व्यायाम केल्यास पाठदुखी कमी होते.
नेहमी बसताना व चालताना पाठीचा कणा ताठ ठेवा. त्यावर अधिक ताण देऊ नका. जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे किंवा उभे राहणे टाळा. गरम किंवा थंड शेक पाठीच्या दुखऱ्या भागावर लावल्याने आराम मिळतो. जर पाठदुखी तीन दिवसांपेक्षा जास्त काळ असेल तर तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या.