
वेश्या व्यवसायासाठी मुली पुरवणाऱया महिलेला गुन्हे शाखेच्या अधिकाऱयाने अटक केली. विशाखा ऊर्फ नीलम असे तिचे नाव आहे. पोलिसांनी करवीर करून दोन तरुणीची सुटका केली. घडल्या प्रकरणी नीलमला अटक करून न्यायालयात हजर केले असता तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. नीलम ही काही तरुणीच्या मदतीने सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या मदतीने तिच्याशी संपर्क साधून तरुणीची मागणी केली. सौदा पक्का झाल्यानंतर गोराई येथील एका हॉटेलमध्ये तिच्याशी आर्थिक व्यवहार सुरू असताना गुन्हे शाखेने तिच्यावर कारवाई केली.