
निवड समितीने सुचवलेल्या बदलांचा समावेश करण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आयकर विधेयक 2025 मागे घेत असल्याची घोषणा आज केली. पेंद्र सरकार नवीन आयकर विधेयक 2025 आता येत्या 11 ऑगस्ट रोजी संसदेत सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
13 फेब्रुवारी रोजी नवीन आयकर विधेयक संसदेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक निवड समितीकडे पाठवण्यात आले होते. निवड समितीने 21 जुलै रोजी या विधेयकासंदर्भात अहवाल सादर केला होता. त्यामुळे आता या नवीन आयकर विधेयकात निवड समितीने सुचवलेल्या शिफारशींचा विधेयकात समावेश करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.