नवी दिल्लीत विरोधकांचा आवाज घुमला; पोलिसांनी आंदोलकांना रोखले, राहुल गांधी, संजय राऊत यांच्यासह अनेक नेते ताब्यात

नवी दिल्लीत मतचोरी विरोधात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत प्रचंड मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोर्चाला पोलिसांनी अडवले असून राहुल गांधी, प्रियांका गांधी संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांना ताब्यात घेत त्यांना संसदेत सोडण्यात आले.

बिहार SIR आणि ‘मतचोरीवर’ राजकारण आता तापले आहे. विरोधी पक्ष आणि निवडणूक आयोग यांच्यात संघर्ष सुरू आहे. SIR आणि मतचोरीवर रस्त्यापासून संसदेपर्यंत युद्ध सुरू आहे. बिहारमधील मतदार यादीतील अनियमितता आणि निवडणुकीत झालेल्या कथित हेराफेरीच्या विरोधात ‘इंडिया’ ब्लॉक ने मोर्चा काढला आहे. विरोधी पक्षाचे खासदार निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जात असतना पोलिसांनी त्यांना मध्येच रोखले. त्यांना मोर्चासाठी परवानगी नसल्याचे सांगत मोर्चा अडवण्यात आला.

समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव म्हणाले की ते आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांचा वापर करत आहेत. पोलिस विरोधी खासदारांना निवडणूक आयोगाकडे कूच करण्यापासून रोखत असताना त्यांनी हे सांगितले, त्यानंतर ते निषेध करण्यासाठी बसले. विरोधी पक्षांचे खासदार आता पोलिसांनी ज्या ठिकाणी त्यांना रोखले आहे तिथे बसून निषेध करत आहेत. अखिलेश यादव यांनीही बॅरिकेड ओलांडली आहे आणि दुसऱ्या बाजूला धरणे धरले आहे. विरोधी पक्षाच्या खासदारांनी पोलिसांचे बॅरिकेड तोडले आहेत. अखिलेश यादव यांनी बॅरिकेड चढून पोलिसांना ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे. समाजवादी पक्षाचे खासदार पोलिसांच्या बॅरिकेड चढण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिस त्यांना जाण्यापासून रोखत आहेत. त्यामुळेच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मोर्चा अडवल्यानंतर राहुल गांधी, प्रियांका गांधी, संजय राऊत, अखिलेश यादव यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना त्यानंतर पुन्हा संसदेत सोडण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे जाताना विरोधी पक्षाच्या पदयात्रेला पोलिसांनी रोखले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की त्यांना यासाठी परवानगी मिळालेली नाही. यावर राहुल गांधी आणि पोलिस अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ झाला आहे. राहुल गांधी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे.

निवडणूक आयोग विरोधी पक्षांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार आहे. मात्र, कार्यालयात इतक्या जास्त लोकांच्या बसण्याची व्यवस्था नसल्याने फक्त 30 जणांशी ते संवाद साधणार आहे.