14 ऑगस्टला ऋतिकचा ‘वॉर-2’ ही बॉक्स ऑफिसवर धडकणार, रजनीकांतच्या ‘कुली’ची रेकॉर्डब्रेक तिकीट विक्री

‘थलैवा’ रजनीकांतचा ‘कुली’ आणि ऋतिक रोशनचा ‘वॉर-2’ या आठवडय़ात एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या तिकिटांची ऍडवॉन्स बुकिंग सुरू झाली आहे. पहिल्याच दिवशी ‘कुली’ चित्रपटाची जवळपास 70 हजार तिकीट विक्री झाली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ऍडवॉन्स तिकिटातून 26.38 कोटी रुपयांची कमाई केली आहे, तर ऋतिकच्या ‘वॉर-2’ने प्रदर्शनापूर्वी 8.70 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. कुली चित्रपटाने वॉरच्या तुलनेत 203 टक्के जास्त कमाई केली आहे. ऍडवॉन्स बुकिंगमुळे ‘कुली’ चित्रपट पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर 70 ते 80 कोटी कमावेल, अशी शक्यता आहे. या चित्रपटाला हिंदी, तामीळ, तेलुगू, कन्नड आणि इंग्रजीत प्रदर्शित केले जाणार आहे. ‘कुली’मध्ये रजनीकांत मुख्य भूमिकेत आहे. यासोबत अकिकनेनी नागार्जून आणि आमीर खान यांच्या भूमिका आहेत. ऋतिक रोशन आणि ज्युनिअर एनटीआर यांचा ‘वॉर-2’ हा या वर्षीचा बिग बजेट चित्रपट आहे. ‘कुली’ आणि ‘वॉर-2’ हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर एकाच वेळी प्रदर्शित होणार असल्याने कोणता चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करणार हे स्पष्ट होईल.