आयफोनमध्ये वाजणार नवी रिंगटोन

ऍपलने आयओएस 26 चे सहावे डेव्हलपर बीटा जारी केले. या अपडेटमुळे आयफोन चाहत्यांना बरेच काही नवीन मिळणार आहे. या अपडेटमध्ये ऍपलने आयफोन युजर्ससाठी नवीन रिंगटोनसुद्धा दिली आहे. हे अपडेट आयपॅड, ऍपल वॉच, ऍपल टीव्ही, मॅकबुक आणि ऍपलच्या अन्य डिव्हाईससाठी उपलब्ध राहणार आहे. रिंगटोनसोबत नवीन ऑनिमेशन, सिस्टममध्ये लिक्विड ग्लास इफेक्ट यांसारखी सुविधा देण्यात आली आहे. नव्या अपडेटमध्ये नवीन रिंगटोनसोबत अनेक व्हेरिएशन आहेत. बोंएट, ड्रिमर, टेक, पॉप, रेफ्लेक्टेड आणि सर्ज उपलब्ध आहेत. याशिवाय एक नवीन रिंगटोन लीट्ल बर्डसुद्धा जोडली आहे.