
राज्य शासनाने आज सहा सनदी अधिकाऱयांच्या बदल्या केल्या. डॉ. संजय कोलते यांची बदली शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालकपदावर करण्यात आली आहे. डॉ. अशोक करंजकर उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ सचिव, सुशील खोडवेकर असंघटित कामगार विकास आयुक्त, सावन पुमार भंडारा जिल्हाधिकारी, नमन गोयल नंदुरबार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. डी. व्ही. एस. पवनदत्ता इगतपुरी सहाय्यक जिल्हाधिकारी आणि लघिमा तिवारी यांच्याकडे गोंडपिंपरी सहाय्यक जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.