जीवनात अनेक घटना घडल्या पण कधी मृत व्यक्तींसोबत चहा प्यायची संधी नव्हती मिळाली, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगाला टोला

ज्यांना निवडणूक आयोगाने मृत घोषित केले अशा काही व्यक्तींना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात आले होते, असा दावा निवडणूक आयोगाविरोधात याचिका दाखल करणाऱ्या योगेंद्र यादव यांनी केला होता. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात हजर झालेल्या त्या ‘मृत’ व्यक्तींची बुधवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भेट घेतली.

या भेटीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला. ”जीवनात अनेक घटना घडल्या पण कधी मृत व्यक्तींसोबत चहा प्यायची संधी नव्हती मिळाली. आज ते देखील अनुभवायला मिळालं. धन्यवाद निवडणूक आयोग’, असे ट्विट करत राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला जोरदार टोला लगावला.