
स्वातंत्र्यदिनी गांधीवादी झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील रोहिणी येथे देशातील पहिल्या आठ पदरी उन्नत महामार्गाचे उद्घाटन करताना पुन्हा एकदा स्वदेशीचा नारा दिला. यंदाच्या दिवाळीला फक्त हिंदुस्थानात बनवलेल्या वस्तूच खरेदी करा, असे आवाहन करतानाच व्यापाऱयांनीही परदेशी वस्तू सोडून स्वदेशी वस्तूंचीच विक्री करावी, अशी विनंतीही मोदी यांनी केली. दरम्यान, यंदाच्या दिवाळीत डबल बोनस मिळणार असल्याचेही मोदी म्हणाले,
द्वारका एक्स्प्रेससोबतच मोदींनी अर्बन एक्सटेंशन रोड-2चेही उद्घाटन करण्यात आले. आपण परदेशातून खेळणी आयात करायचो. आम्ही स्थानिक पातळीवर खेळणी बनविण्याचा संकल्प केला आणि आज आम्ही 100 हून अधिक देशांमध्ये खेळणी पाठवतो, असा दावाही मोदींनी केला.
मोबाईल निर्मितीत हिंदुस्थान आत्मनिर्भर
11 वर्षांपूर्वी हिंदुस्थान मोबाईल फोनची मोठय़ा प्रमाणावर परदेशातून आयात करत होता. मात्र, आता देशात दर वर्षी 30 ते 35 कोटी मोबाईल फोनची निर्मिती होत आहे. तसेच मोठय़ा प्रमाणावर निर्यातही होत आहे, असेही मोदी म्हणाले. हा बदल हिंदुस्थानची उत्पादन क्षमता आणि मेक इन इंडियाची यशस्वी वाटचाल अधोरेखित करतो, असा दावाही मोदींनी केला.