
एखाद्या कंपनीतून दुसऱ्या कंपनीत गेल्यानंतर बऱ्याचदा पीएफचे पैसे ट्रान्सफर होत नाहीत किंवा खात्यातील पैसे काढता येत नाहीत.
जर अशी समस्या येत असेल तर सर्वात आधी तुमचा यूएएन नंबर, आधार, पॅनकार्ड आणि बँक खात्यांशी केवायसी केलेली आहे का हे तपासा.
यूएएन, पासवर्ड आणि कॅप्चाचा वापर करून ईपीएफओ सदस्य पोर्टलवर जाऊन लॉगईन करा. त्या ठिकाणी खात्यावर किती रक्कम आहे हे तपासा.
केवायसी पूर्ण असेल तर 5 लाखांपर्यंतच्या क्लेमची रक्कम ऑटो सेटलमेंट करता येते. यानंतर ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते.
पीएफ खात्यातून वारंवार पैसे काढणे टाळा. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. खाते सुरक्षित ठेवण्यासाठी यूएएनला आधार, पॅन, बँक खात्याशी लिंक करणे आवश्यक आहे.