
द अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स (एएसएमई) ही अभियांत्रिकीच्या विविध शाखांमध्ये सहकार्य आणि ज्ञान-विनिमयाला प्रोत्साहन देणारी आघाडीची आंतरराष्ट्रीय संस्था, आपला प्रमुख कार्यक्रम इंटरनॅशनल मेकॅनिकल इंजिनिअरिंग काँग्रेस अँड एक्स्पोझिशन (आयएमईसीई) प्रथमच हिंदुस्थानात आयोजित करणार आहे. हा कार्यक्रम हैद्राबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर (एचआयसीसी) येथे 10 ते 13 सप्टेंबर 2025 दरम्यान पार पडणार असून, काँग्रेसच्या नवोन्मेष, संशोधन आणि जागतिक सहभागाच्या परंपरेतील एक ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे.
परंपरेने अमेरिकेत आयोजित होणारी आयएमईसीई परिषद ही जगभरातील विचारवंत, संशोधक, उद्योगतज्ज्ञ, धोरण-निर्माते आणि विद्यार्थी यांना एकत्र आणते, जे विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेषातील नवे शोध व प्रगतीचा अभ्यास करतात. 650 हून अधिक संशोधन निबंध व तांत्रिक सादरीकरणे, 1500 प्रतिनिधी आणि 100 प्रदर्शकांसह, पहिलीच आयएमईसीई इंडिया 2025 आवृत्ती अभियांत्रिकी ज्ञानवृद्धी, शैक्षणिक व औद्योगिक सहकार्य बळकट करणे आणि जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी नवोन्मेषी उपाययोजना गतीमान करण्यासाठी उत्प्रेरक ठरणार आहे.
शाश्वतता, नवोन्मेष आणि समावेशकता हीच आयएमईसीई इंडिया 2025 ची मुख्य संकल्पना आहे. ही संकल्पना विविध विषयांचा व्यापक आवाका दर्शवते, अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्पादन प्रक्रियांपासून ते यांत्रिक प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि रोबोटिक्सच्या एकत्रीकरणापर्यंत, तसेच शाश्वत डिझाईन पद्धतींपासून ते जागतिक सामाजिक आव्हानांना सामोरे जाण्यात यांत्रिक अभियांत्रिकीच्या भूमिकेपर्यंत.
तीन दिवसीय या परिषदेत विविध तांत्रिक विषयांवर आधारित व्यापक कार्यक्रम सादर केला जाणार आहे. यात ऍडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग व 3डी प्रिंटिंग, प्रगत साहित्य व उत्पादन तंत्रज्ञान, थर्मल तंत्रज्ञानातील प्रगती, सेमी-कंडक्टर उत्पादन, स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञान व प्रणाली, एआय/एमएल सह सायबर फिजिकल सिस्टिम्स, गॅस टर्बाईन्स, प्रेशर टेक्नॉलॉजीज, रोबोटिक्स व ऑटोमेशन, स्ट्रक्चरल डायनॅमिक्स व मटेरियल्स, तसेच ऑफशोर व ऑनशोर पाइपलाइन ट्रान्समिशन व डिस्ट्रीब्युशन सिस्टिम्स अशा अनेक विषयांचा समावेश असेल. या सत्रांमधून विविध उद्योगांमध्ये यांत्रिक अभियांत्रिकीचे भविष्य घडविणाऱ्या नव्या शोधांवर प्रकाश टाकला जाणार आहे.
आयएमईसीई इंडिया 2025 साठी प्रतिनिधी, प्राध्यापक आणि विद्यार्थी यांची नोंदणी आता सुरू झाली आहे.
नोंदणी लिंक : https://www.asme-india.org/imece/register