चिकिथा, शर्वरीचा ‘सुवर्ण’वेध, हिंदुस्थानला चार सुवर्णांसह आठ पदके

तेलंगणाची चिकिथा तनीपार्थी आणि पुण्याची मराठमोळी शर्वरी शेंडे यांनी जागतिक युवा तिरंदाजी अंिजक्यपदक स्पर्धेत सोमवारी सुवर्णवेध साधला. या स्पर्धेत हिंदुस्थानी तिरंदाजांनी 4 सुवर्ण, 2 रौप्य व 2 कांस्य अशी एकूण 8 पदके जिंकली.

चिकिथा तनीपार्थीने हिने महिलांच्या 21 वर्षांखालील कंपाउंड विभागात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकत नवा अध्याय लिहिला. याचबरोबर 16 वर्षीय शर्वरी शेंडेने 18 वर्षांखालील महिला रिकर्व्ह गटात सुवर्णपदकावर मोहर उमटवली. शिवाय हिंदुस्थानच्या 18 व 21 वर्षांखालील पुरुषांच्या पंपाऊंड संघांनीही सुवर्णपदके पटकावली. 63 देशांतील 570 तिरंदाजांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. हिंदुस्थानी अधिकाऱयांनी तरुण खेळाडूंच्या या यशाचे काwतुक करत हे यश म्हणजे जागतिक पातळीवर हिंदुस्थानी तिरंदाजांच्या प्रगतीचा मैलाचा दगड असल्याचे त्यांनी नमूद केले. या 19व्या जागतिक युवा तिरंदाजी अंिजक्यपदक स्पर्धेत 63 राष्ट्रांचे 570 खेळाडू उतरले होते. त्यामुळे अलीकडच्या काळातील ही स्पर्धा सर्वाधिक स्पर्धात्मक ठरली. 2023 मध्ये आयर्लंडमध्ये झालेल्या स्पर्धेत हिंदुस्थानने 6 सुवर्ण जिंकले होते.

चिकिथाचे ऐतिहासिक सुवर्णपदक

हिंदुस्थानच्या तिरंदाजांनी विविध गटात झळाळती कामगिरी करत 4 सुवर्णपदके जिंकली. आठव्या क्रमांकावरून स्पर्धेत उतरलेली चिकिथा तनीपार्थीने 21 वर्षांखालील महिला कंपाउंडमध्ये कोरियाच्या अव्वल मानांकित पार्क येरिनला 142-136 अशा फरकाने पराभूत केले. हा हिंदुस्थानचा या गटातील पहिलाच सुवर्णविजय ठरला.

शर्वरीचा शूट ऑफमध्ये विजय

20व्या मानांकित शर्वरी शेंडेने 18 वर्षांखालील महिला रिकर्व्हमध्ये कोरियाच्या किम येवोनविरुद्ध झुंज दिली. निर्णायक शूट-ऑफमध्ये तिने परफेक्ट ‘10’ मारत 10-9 असा विजय निश्चित केला. ‘‘मला खूप अभिमान वाटतो, मी माझ्या हिंदुस्थानचा अभिमान वाढवला,’’ असे ती आनंदाने म्हणाली. याचबरोबर पुरुषांच्या 18 व 21 वर्षांखालील कंपाउंड संघांनी अनुक्रमे अमेरिकेला आणि जर्मनीला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. पृथिका प्रदीपने 18 वर्षांखालीलर महिला कंपाउंडमध्ये वैयक्तिक, तसेच सांघिक गटात रौप्यपदक जिंकून हिंदुस्थानी प्रतिभेची ताकद दाखवून दिली.