
गुहागर तालुक्यात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानेश्वर काळूराम चव्हाण हे आपल्या पत्नी व मुलासह गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता होते. अखेर गुरुवारी सकाळी ते कुटुंबियांसह माण तालुक्यातील गोंदवले महाराज मठ परिसरात सुखरुप सापडले आहेत. चव्हाण कुटुंब दर्शनासाठी गोंदवले येथे आल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानिकांनी त्यांना ओळखताच संबंधित अधिकाऱ्यांना व नातेवाईकांना माहिती दिली. त्यानंतर त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साझल्यानंतर ते सर्वजण सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.
चव्हाण कुटुंब गणेशोत्सवानिमित्त आपल्या मूळ गावी हिंगोलीकडे गेले होते. मात्र, 26 ऑगस्ट रोजी संध्याकाळी चिपळूण परिसरात त्यांचा अचानक संपर्क तुटला होता. मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. त्यामुळे नातेवाईक चिंतेत होते, त्यामुळे त्यांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलिसांकडून शोधमोहीम राबवली जात होती. गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गुरुवारी सकाळी ते आणि कुटुंबि. सुखरुप असल्याची माहिती मिळाल्याने नातेवाईक, सहकारी शिक्षक व गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रशासनानेही ते सुखरूप असल्याची पुष्टी केली आहे.