Ratnagiri News – रत्नागिरी पोलीस दलाकडे अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कायद्याच्या अंमलबजावणीकरीता महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाला अत्याधुनिक मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दिली आहे. या व्हॅनचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी, पोलीस उप अधीक्षक राधिका फडके, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. गुन्ह्याचे घटनास्थळ संरक्षित करणे, घटनास्थळावरून भौतिक, रासायनिक, जैविक आणि डिजीटल पुरावे गोळा करण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. व्हॅनसोबत फॉरेन्सिक तज्ञ उपलब्ध करून देण्यात आले आहेत.