
खासगी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुगल कंपनीला दोषी ठरवत अमेरिकेतील एका कोर्टाने 425 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 3 हजार 540 कोटी रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. गुगलने युजर्सच्या परवानगीविना त्यांचा डेटा ट्रक केला आणि त्यांच्या हालचाली रेकॉर्ड केल्याचा आरोप आहे. 2020 मध्ये गुगलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुगलने आपल्या वेब आणि अॅप ऑक्टिविटी सेटिंग्समध्ये दिलेल्या प्रायव्हसी नियमांचे पालन केले नव्हते. यामुळे जवळपास 9.8 कोटी युजर्स आणि 17.4 कोटी डिव्हाईसवर परिणाम झाला होता. सुरुवातीला याचिकाकर्त्यांनी गुगलकडे 31 अब्ज
डॉलरची नुकसान भरपाई मागितली होती. अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने निकाल देताना म्हटले की, गुगलने 3 पैकी 2 प्रायव्हसी नियमांचे उल्लंघन केले आहे. कंपनीने हे जाणीवपूर्वक केले नाही, हे आम्हाला माहिती आहे, परंतु युजर्सला जी आश्वासने दिली होती, त्याविरोधात हे सर्व होते, असे कोर्टाने म्हटले. गुगलची ही ट्रकिंग केवळ त्यांच्या प्लॅटफॉर्मपर्यंत मर्यादित नव्हती, असेही कोर्टाने म्हटले.