
मुंबईसह देशभरात आज अद्भुत आणि दुर्मिळ असा खगोलीय चमत्कार पाहायला मिळाला. वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण आज झाले. हे ग्रहण पूर्ण ग्रहण होते. या ग्रहणानंतर चंद्राचा लालभडक अवतार (ब्लड मून) पाहायला मिळाला.
आज रात्री 9 वाजून 56 मिनिटांनी हे पूर्ण चंद्रग्रहण सुरू झाले. एरवी शुभ्र दिसणारा व शीतल भासणारा चंद्र रविवारच्या रात्री जणू आग ओकत होता. रक्तासारखा लालभडक झाला होता. मुंबईसह महाराष्ट्र व देशाच्या अनेक भागांत चंद्राच्या या वेगळ्या अवताराचे दर्शन झाले.
ब्लड मून म्हणजे काय?
पृथ्वी जेव्हा सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा पूर्ण चंद्रग्रहण होते आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सावली पडते. त्यावेळी चंद्र लाल दिसतो. लाल दिसणारा हा चंद्र ’ब्लड मून’ म्हणून ओळखला जातो. हा एक दुर्मिळ योग असतो.