
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री अजित पवार यांच्या नावाखाली संचालक मंडळाने गैरकारभार करत तब्बल 200 कोटींचा भ्रष्ट्राचार केला आहे. या घोटाळ्यात अधिकारी सामील असून मंत्रालयापर्यंत हफ्ते दिले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला.
बाजार समितीत 4 हजार बोगस परवाने देऊन शेतकऱ्यांना लुटले जात आहे. शेतकऱ्यांशी घेणेदेणे नसलेल्यांना फुलबाजारातील गाळय़ांचे वाटप करत घोटाळा केला आहे. बाजारात अतिक्रमण करत केस कापणाऱ्यांपासून गुटखा विक्री करणाऱ्यांना जागांचे वाटप केले. पाकि&ंगच्या नावाखाली शेतकरी व वाहतूकदारांची लूट होत आहे. रोजंदारी कर्मचाऱ्यांची भरती करून पुन्हा घोटाळा करण्याचा विचार सुरू आहे. शासनाने याप्रकरणाची तातडीने चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पवार यांनी केली.
मंत्रालयापर्यंत पाकिटे पोहोचली
बाजार समितीच्या भ्रष्ट्राचाराचा मुद्दा अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर उच्चस्तरीय चौकशीची घोषणा पणनंमत्र्यांनी केली. मात्र, पणन आणि मंत्रालयातील अधिकाऱयापर्यंत पैशांची पाकीटे पोहचल्याने यावर काही झाले नाही. तर यापुर्वी नेमलेल्या चौकशी समितीत भ्रष्ट्राचारात सहभागी असलेले जिल्हा उपनिब्ंधक जगताप यांची निवड केल्याचे रोहित पवार म्हणाले.