
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे भेट घेतली. यावेळी शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, आमदार अॅड. अनिल परब, मनसे नेते बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे उपस्थित होते.
याआधी गणेशोत्सवादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सहकुटंब शिवतीर्थ येथे जाऊन राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचे दर्शनही घेतले होते. यावेळी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. त्यानंतर आता पुन्हा ठाकरे बंधुंची भेट होत आहे.
उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब राज ठाकरे यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं घेतले दर्शन pic.twitter.com/hukZgHRG2E
— Saamana Online (@SaamanaOnline) August 27, 2025