
कोकणच्या कला-संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान असलेला आणि चतुरस्र अभिनेते दिलीप प्रभावळकरांच्या इरसाल अभिनयाने नटलेला ‘दशावतार’ हा चित्रपट येत्या 12 सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराई, देवराईंचे राखणदार यांची गूढरम्यता ‘दशावतार’च्या निमित्ताने पाहता येणार आहे. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यात त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत. त्यातला त्यांचा लूक पाहून तुम्ही थक्क झाल्याशिवाय राहणार नाही.


























































