
गृहकर्जाचे व्याजदर कमी व्हावे म्हणून अनेक जण गृहकर्ज (होम लोन) दुसऱया बँकेत ट्रान्सफर करण्याचा पर्याय निवडतात. त्यामुळे ईएमआय कमी होतो.
त्यासाठी तुम्हाला ज्या नवीन बँकेत होम लोन ट्रान्सफर करायचे आहे, त्या बँकेशी संपर्क साधा आणि कर्जासाठी अर्ज करा. त्यासाठीची आवश्यक कागदपत्रे सादर करा.
नवीन बँकेला ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा आणि तुमच्या विद्यमान कर्जाचे तपशील (बॅलन्स स्टेटमेंट) सादर करावे लागतील.
विद्यमान बँकेकडे संपर्क साधा आणि कर्ज ट्रान्सफर करत आहात हे नमूद करणारे पत्र सादर करा. यानंतर तुम्हाला एनओसी, आऊटस्टँडिंग अमाऊंटचे तपशील मिळवावे लागतील.
नवीन बँक तुमच्या आर्थिक स्थितीचा, उत्पन्नाचा आणि क्रेडिट स्कोअरचा अभ्यास करेल आणि तुमच्या मालमत्तेचे मूल्यांकन करेल.