स्लायडिंग खिडक्यांचे ट्रॅक खराब झाले तर हे करून पहा…

आजकाल बहुतेक घरांमध्ये स्लायडिंग विंडोज असतात. या खिडक्यांचे अॅल्युमिनियम ट्रक साफ करण्यासाठी काही घरगुती सोपे उपाय आहेत. ट्रकमधल्या अरुंद खाचांमध्ये मोठे ब्रश किंवा कपडे पोहोचत नाहीत. अशा वेळी जुना टूथब्रश खूप कामी येतो. साबणाच्या पाण्यात तो भिजवा आणि ट्रकमध्ये घासून घ्या.

भांडी घासण्यासाठी वापरली जाणारा हिरवा स्पंज साबणाच्या पाण्यात भिजवा. मग ती स्पंज दुमडून त्यात मोठी क्लिप किंवा पह्ल्डर क्लिप लावा. स्पंजचा ओपन भाग थेट ट्रकमध्ये फिरवा. त्यामुळे खोलवर बसलेली धूळ, चिकट मळ आणि डाग लगेच निघून जातात. कठीण डाग किंवा ग्रीससाठी बेकिंग सोडा खूप उपयोगी ठरतो.