
राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशातील आंतरराज्य टोळीतील चारजणांना पोलीसांनी ताब्यात घेतले. रोख रक्कम, वाहनासह 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसापूर्वी पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण हद्दीमध्ये अज्ञात आरोपीच्या टोळीने ए.टी.एम. मशीन गॅस कटरने तोडून त्यामधील रोख रक्कम चोरल्याची घटना घडली होती. त्यावरून अज्ञात आरोपींच्या टोळी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. एटीएम मशीन कट करून त्यामधील रोख रक्कम चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील चारजणांना दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 03 वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यांच्याकडे गॅस टाकी, ऑक्सिजन सिलेंडर, गॅस कटर, तेलंगणा राज्याचे दोन बनावट नंबर प्लेट, तसेच एक लाकडी मूठ असलेला खंजीर व रोख 01 लाख रुपये मिळून आले. मोहम्मद फजरूद्दीन(40) (राजस्थान), मुस्तकीम आमीन(26) (हरियाणा)
हमीद हबीबखान (25) (मध्य प्रदेश). लीखीमन हूरी (गुज्जर) (27) (राजस्थान) यांना अटक करण्यात आली आहे.
उदगीर येथील ए.टी.एम. गॅस मशीनने कट करून त्यामधील रोख रक्कम एक लाख रुपये चोरी केल्याचे कबूल केले. सदरची चोरी केलेली रोख रक्कम एक लाख रुपये , गॅस सिलेंडर, ऑक्सीजन सिलेंडर गॅस, कटर, खंजीर तसेच गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 12 लाख 24 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस अमलदार सर्जेराव जगताप, युवराज गिरी, रियाज सौदागर, राजेश कंचे, गोविंद भोसले, जमीर शेख, मोहन सुरवसे, सिद्धेश्वर मदने, राहुल कांबळे,शैलेश सुडे, हरी पतंगे, महिला पोलिस अमलदार अंजली गायकवाड यांनी केली आहे.