
श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सरकारी बंगला सोडणार असल्याची माहिती दिली. संसदेत नवीन कायदा लागू झाला असून या कायद्यानुसार, माजी राष्ट्रपतींना मिळणारे विशेषाधिकार संपवण्यात आले आहेत. राजपक्षे यांचा सरकारी बंगला कोलंबो येथील सिनेमन गार्डन येथे आहे. महिंदा राजपक्षे हे 2005 ते 2015 पर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते.